प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच बंड होऊन दीड वर्ष पूर्ण झाली असून आमदार अपात्र प्रकरणी सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. आज १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यावर निकाल देणार आहेत. त्यामुळे कोणते आमदार पात्र अन् कोणते अपात्र ठरणार या बद्दल निर्णय होणार आहे.
राज्याच्या राजकारणातील आज महत्वाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत मागणी केली होती.
तर शिंदे गटाने देखील ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात धाव घेतली. तब्बल दीड वर्ष हा संघर्ष कोर्टात सुरू होता. अखेर कोर्टाने हा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला होता.
विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अनेकदा कोर्टाने खंडसावल्यानंतर आज ते या बाबत निकाल देणार आहे. त्यामुळे कोणते आमदार अपात्र आणि कोणत्या गटाचे आमदार पात्र ठरतील या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जर शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तर भाजपचा प्लॅन बी काय असेल याची देखील चर्चा सुरू झाली आहे.शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे हे १६ आमदारासोबत गुवाहाटीला गेले होते.
यानंतर महावीकास आघाडीसरकार कोसळले होते. दरम्यान, यानंतर उद्धव ठाकरे गट शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, शिंदे गट देखील उद्धव ठाकरे गटातील १४ आमदार अपात्र ठरवण्यात यावे या साठी कोर्टात गेले होते.
या वर तब्बल दीड वर्ष सूनवण्या झाल्या. कोर्टाने तारीख पे तारीख करत हा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांना या बाबत निकाल देण्याचे सांगितले. दरम्यान, हा निकाल देऊन देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप या बाबत निकाल दिला नव्हता. यामुळे ठाकरे गटाने पुन्हा कोर्टात धाव घेत या बद्दल निकाल देण्याची मागणी केली होती. दरम्यान, कोर्टाने राहुल नार्वेकर यांना फटकारत निकाल लवकर जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानंतर अखेर आज हा निकाल घोषित केला जाणार आहे