सनी देओलच्या सिनेमात भाईजानची एन्ट्री? महबूब स्टुडिओत दोन दिवस होणार चित्रीकरण

0
46

‘गदर 2’ मधून दमदार कमबॅक करणाऱ्या सनी देओलचा (Sunny Deol) भाव सध्या वधारला आहे. त्याच्याकडे सिनेमांची रांग लागली आहे. लवकरच तो आमिर खानच्या ‘लाहोर 1947’मध्ये दिसणार आहे. आमिर खान केवळ सिनेमाची निर्मिती करणार आहे.

दुसरीकडे सध्या सनी पाजी आगामी ‘सफर’ सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता नवीनच आलेल्या अपडेटनुसार, या सिनेमाच सलमान खानचाही (Salman Khan) कॅमिओ असण्याची शक्यता आहे.

भाईजानचे चाहते केवळ बाहेरच नाहीत तर इंडस्ट्रीतही आहेत. सनी देओल आणि सलमान खानची मैत्री सर्वश्रुत आहे. सलमानने सनी आणि बॉबी या दोन्ही भावांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली होती.

दोघंही त्याला प्रेमाने ‘मामू’ म्हणतात. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, सनी देओलच्या ‘सफर’ सिनेमात सलमान खानचीही एन्ट्री होत आहे. 12 आणि 13 जानेवारीला महबूब स्टुडिओत सलमान खान सनी देओलसोबत शूट करु शकतो अशी चर्चा आहे. सलमानचा यामध्ये कॅमिओ रोल असणार आहे.

सलमान खान खरंच ‘सफर’मध्ये दिसणार का याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. यापूर्वी सलमानने शाहरुख खान, अजय देवगण, रणबीर कपूर, रितेश देशमुख यांच्या सिनेमात कॅमिओ केला होता. सलमान खानचा ‘टायगर 3’ नुकताच रिलीज झाला. सिनेमाने समाधानकारक कमाई केली. तर आता तो आगामी ‘द बुल’ सिनेमात दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here