आंबा : पूर्णागिणी अशी ओळख उभी करताना बदलत्या काळाची पावले ओळखून विधवा महिलांनी सक्षम बनवे.समाजाने स्वत्व जपणारा सन्मान व सुरक्षिततेची हमी देणारी मानसिकता जपावी असे प्रतिपादन
एम. आर.पाटील यांनी केले.आंबा येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात
कै.सुहासिनी जोग यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित
पुर्णागिणी (विधवा महिला) शिबीरात ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी डॉ .व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अश्विनी भिडे होत्या.प्रारंभी सुहासिनी जोग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र लाड म्हणाले,अनिष्ठ प्रथा व परंपरा यांना तिलांजली देऊन पुर्णागिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
यावेळी आंबा, चाळणवाडी, तळवडे, हुंबवली, मानोली,धनगरवाडा,कांबळेवाडी येथील महिला उपस्थित होत्या.शिबीरार्थी महिलांना टॉवेल व भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सह्यगिरी महिला बचत गटाच्या सचिव श्रीमती प्रतिभा कोकाटे,अंगणवाडी सेविका फाटकबाई , ग्रामसेवक सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले.शिबीरासाठी डॉ.व्ही.टी.पाटील फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर,श्रुती पाटील,सारीका कामेरकर,रेश्मा बेर्डे यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी:आंबा येथे आयोजित पुर्णागिणीसाठी शिबीरात मार्गदर्शन करताना एम.आर.पाटील.