कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूरमधून २७६ विद्यार्थी बसले होते.
यामधून १३ विद्यार्थी सीए झाले. कोल्हापूर विभागातून सिद्धांत संतोष मेहता यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ऋषभ कीर्तीकुमार पटेल यांनी द्वितीय, श्रेयस चेतन दळवी यांनी तृतीय, सागर महेंद्र पटेल यांनी चौथा क्रमांक पटकावला.
या परीक्षेत अल्पना चंद्रकांत व्हावळ, शुभम अरुण हेर्लेकर, स्नेहल जयवंत कुंभार, केदार मिलिंद कुलकर्णी, किंजल अशोक मेहता, प्रज्ञा संजय पाटील, दीप्ती प्रदीप तिप्पाण्णा, रोहिणी शिवानंद बागेवाडी, आणि विशाल विजय सपाटे हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे प्रत्येक वर्षी मे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. चार्टर्ड अकाऊंटंट कोर्स हा विश्वस्तरीय मान्यता असलेला कोर्स असल्याने त्याची परीक्षा ही अवघड समजली जाते. या कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेशी संपर्क साधा, असे आवाहन अध्यक्ष आशिष भोसले यांनी केले.