टाटा समूह दोन कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत; पुढील आठवड्यात घोषणा, जाणून घ्या नावं?

0
69

टाटा समूह आणखी दोन कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) लवकरच कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑरगॅनिक इंडियाच्या खरेदीची घोषणा करू शकते.

कॅपिटल फूड्स चिंग्स सीक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत कॉन्डिमेंट्स, फूड प्रोडक्ट्स आणि इनग्रेडियंट्स तयार करते. तर, ऑरगॅनिक इंडिया फॅब इंडियाच्या मदतीनं चहा आणि आरोग्य उत्पादनं तयार करते.

पुढच्या आठवड्यात होऊ शकते घोषणा

या दोन कंपन्यांच्या अधिग्रहणानंतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला (TCPL)नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यास आणि ऑरग‌ॅनिक वस्तूंसह पोर्टफोलिओ मजबूत करण्यास मदत होईल. या डील्सची घोषणा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला केली जाऊ शकते. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडचे (Tata Consumer Products Limited) शेअर्स शुक्रवारी ३ टक्क्यांहून अधिक वाढून ११६१ रुपयांवर पोहोचले. ही कंपनीच्या शेअर्सची एका वर्षाची उच्चांकी पातळी आहे.

५१०० कोटींमध्ये डील

टीसीपीएल आता कॅपिटल फूड्समधील ७५ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. टाटा कंझ्युमर हा स्टेक इनव्हस ग्रुप आणि जनरल अटलांटिककडून खरेदी करेल. युरोपियन फॅमिली ऑफिस आणि इनव्हेस्टमेंट शाखा इनव्हस ग्रुपचा कॅपिटल फूड्समध्ये ४० टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, जनरल अटलांटिकचा कॅपिटल फूड्समध्ये ३५ टक्के हिस्सा आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीतील हा हिस्सा ५१०० कोटी रुपयांना विकत घेत आहे. टाटा कंझ्युमरच्या स्टेकचे मूल्य ३८२५ कोटी रुपये असेल. त्याच वेळी, कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता सध्या कंपनीत २५ हिस्सा ठेवतील, जे भविष्यात टाटा समूह विकत घेईल.

कंट्रोलिंग हिस्सा खरेदी करणार

टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड १८०० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर ऑरगॅनिक इंडियामध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करणार आहे. टाटा कन्झ्युमर, ऑरगॅनिक इंडियाचं फॅब इंडियाकडून अधिग्रहण करत आहे. फॅब इंडियाला प्रेमजी इनव्हेस्ट आणि लाईटहाऊस कॅपिटलचा सपोर्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here