दगडूचं ठरलं! प्रथमेश परबचा ‘या’ दिवशी होणार साखरपुडा, तारीख आली समोर

0
120

‘टाइमपास’ फेम प्रथमेश परबची सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रथमेश लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.

काही दिवसांपू्र्वीच त्यांचं केळवण झालं. केळवणाचे फोटो पोस्ट करत क्षितीजाने लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा क्षितीजाने फोटो शेअर करत साखरपुड्याची तारीख सांगितली आहे.

क्षितीजाने प्रथमेशबरोबरचे फोटो शेअर करत त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. याबरोबरच साखरपुडा कधी करणार? याचंही उत्तर तिने पोस्टमधून दिलं आहे. पण, अद्याप त्यांनी लग्नाची तारीख मात्र सांगितलेली नाही. क्षितीजा आणि प्रथमेश १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन्स डेला साखरपुडा करणार आहेत. “Valentine’s Day चं आमच्या relationship मध्ये special स्थान आहे. म्हणजे individually आम्ही Valentine’s day वगैरे या concept वर कधी फार believe नाही करायचो, नेहमीच्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात,” असं क्षितीजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, “14 फेब्रुवारी 2020- माझी व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेश ने मला पहिल्यांदा मेसेज केला. 14 फेब्रुवारी 2021- आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. 14 फेब्रुवारी 2022- अनेक आठवणींसह रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023- आमच्या रिलेशनशिपबद्दल social media वर अनाऊंस केलं. 14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या रिलेशनशिपला 3 वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी स्पेशल केलंच पाहिजे ना!!”

प्रथमेश परब आणि क्षितीजा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here