तिटवे: प्रतिनिधी
येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आता शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा
हातभार असेल.
वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम एकत्रित करण्यासाठी आमची संस्था नेहमी आपल्या सोबत असेल असे मत याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन जोडीदाराची विवेकी निवड या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं.
सुख दुःख तर येतातच मात्र ती झेलताना आपल्याबरोबर आपला जोडीदार योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळे कृष्णात स्वाती यांनी काही महत्त्वाच्या बाबी या नात्याबाबत सांगितल्या. त्या प्रत्येकाने जाणून घेतल्यास, जोडीदाराची निवड करणेही सोपे होईल.
आयुष्यभराचा साथीदार निवडताना चौकस असायला हवंच, पण निवड करताना जोडीदाराच्या वरवरच्या भूलभुलैयाला फसू नका. व्यक्तिमत्त्वाबरोबरच धडाडी, कर्तृत्व, समाजातला वावर या गुणांचाही विचार करा असे मत अनिस कार्यकर्ते हर्षल जाधव केले.
याप्रसंगी अनिस कार्यकर्ते अमृता जाधव ,उपप्राचार्य सागर शेटगे , प्रा. दिग्विजय कुंभार, सर्व विभागप्रमुख , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. सिद्धता गौड यांनी केले तर आभार प्रा. शिवानी चौगले यांनी मानले.