गगनबावड्यात खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0
70

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

खासदार धनंजय भिमराव महाडिक यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधून गगनबावडा तालुका भाजपा पदाधिकारी व
महाडिक प्रेमी गगनबावडा यांच्यावतीने
गगनबावडा ग्रामीण रुग्णालय व नव बौद्ध निवासी शाळा गगनबावडा येथे फळे व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गगनबावडा ग्रामस्थ, धनंजय महाडिक यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय महाडिक यांचे समर्थक जावेदभाई आत्तार यांनी केले होते.

या कार्यक्रमाला उत्तम बांडागळे, सचिन जाधव, रंगराव विचारे, गिरीश प्रभुलकर ,राणोजी सुतार, युवराज पाटील, विनोद प्रभुलकर ,बाळासाहेब गुरव, रवींद्र
पाटील, सुहास पांगळे, दीपक आव्हाड ,विजय मसुरकर, तेजस डाकवे, प्रकाश पाटील , अजित दळवी गगनबावडा ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here