महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी आज माध्यमांना दिलेल्या फोन द्वारे मुलाखतीत परवा कणेरी येथील कन्नड फलकां विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने घेतलेल्या आंदोलनात गावकरी व मनसे असा वाद निर्माण झाला मात्र या जमावा पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सर्वांना तोंड देत आपला मराठीचा मुद्दा लावून धरला, मराठी अस्मिता आणि मनसेचे ध्येय धोरण हे अगदी चोखपणे त्यांनी पार पाडले या घडलेल्या घटनेच्या निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व महाराष्ट्रातील जनतेकडून तीव्र शब्दात झाला, पण तेथील काही बालिशपणा करणाऱ्या युवकांनी व्हिडिओ एडिट करून, टाकून त्यावर कॅप्शन टाकून तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला पण या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा सत्य आढळून आले नाही राजू जाधव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिचित आहेत, आणि त्यांनी केलेले काम ही सामाजिक दृष्ट्या अतिशय वाकण्याजोगे आहेत, अन्याय दिसेल तिथे लाथ मारणारा हा युवक कोल्हापूरच्या अनेक रिक्षावाल्यांचा, भाजी मंडळींच्या वाली बनला आहे, या सर्व सामान्य लोकांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आणि यापुढे आमच्या राजू जाधव यांची असली बदनामी खपवून घेतली जाणार नाही असंच कडक शब्दात त्यांनी सांगितला आहे, सदरच्या घटने संदर्भात मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना कळतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पाठीशी व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकारी आणि महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे पक्ष आहे तसेच त्यांचा या धाडसा बदल अभिनंदन मनसेचे नेते माजी गृहराजमंत्री बाळा नांदगावकर यांनी केले आहे, या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्रातील मनसेची ताकद राजू जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे दिसून आले यापुढे देखील कोल्हापूर जिल्ह्यात व कनेरी मठावरती कन्नड भाषेत बोर्ड दिसले तर ते तात्काळ काढले जातील आणि असला प्रकार परत घडला तर त्याच पद्धतीने उत्तर मनसेच्या वतीने दिले जाईल असा इशारा देण्यात आला.
Home Uncategorized कणेरी येथे कन्नड फलका विरोधात कोल्हापूर मनसेने घेतलेल्या आंदोलनास झालेला वाद यासंदर्भात...