प्रतिनिधी प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर महानगर पालिका हद्दतीत राहणारा आपला दिव्यांग बांधव. …..श्री. बबन सुतार (फॉल्ट नं.108 नेहरूनगर कोल्हापूर)
यांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. तेही महापालिका व विद्युत मंडळ यांच्यामुळे गेली 10 ते 11 दिवस झाले मुला-बळासहीत आंधरात आहेत. का तर तो आपल पोट भरण्यासाठी आपल्या सर्व दिव्यांगांच्या अपंग गाड्या दुरुस्त करण्याच काम करतो आहे . आणखी हे पण कोणाच्या सांगण्यावरून तर… प्रहार संघटनेच्या अध्यक्षच्या सांगण्यावरून ….कारण त्याला त्या दिव्यांग बंधवामुळे त्रास होतोय
आज वंदनीय आमदार श्री. बच्चूभाऊ हे अपंगांसाठी अहोरात्र प्रशासनाशी व मंत्रालयात झगडत असताना मात्र कोल्हापूरच्या प्रहाचा अधक्ष त्या दिव्यांग बांधवांच्या पोटावर उठला आहे.
महानगर पालिका प्रशासन दिव्यांगाच्या विकासाच्या मोठ मोठ्या गप्पा मारत होते मग या दिव्यांगवर अन्याय का करत आहे. कुठ गेलं ते शासन तुमच्या दारी ,कुठ गेलं तुमचं दिव्यांग उनतीआभियान….
जर का त्यांची वीज पुरवठा चालू नाही केला तर..
गुरुवार दिनांक 18 जानेवारी सकाळी 11वाजता शहर व जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधव महापालिकेच्या. दारातून शंखघ्वनी व आक्रोश यात्रा करत आंदोलन करण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनांच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या दिव्यांगला न्याय मिळवून देणयासाठी सर्व ताकतीने जतीनिशी हजर राहावे ही विनंती.