‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satavya Mulichi Satvi Mulgi) मालिकेनं अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे.
राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून नेत्रा वाचवू शकेल का, हे २१ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे.
नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते.
विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते. इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल.