थंडीतील साधे इन्फेक्शन थांबवू शकते हृदय, हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

0
53

हिवाळ्यातील वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी याच दिवसांत विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या ऋतूत हृदयविकार आणि ‘ब्रेन स्ट्रोक’चे प्रमाण वाढते. विशेष म्हणजे, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढते, सोबतच एक अंशांपेक्षा तापमान कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक व इन्फेक्शनमुळे होणारे मृत्यू ‘०.५’ टक्क्यांनी वाढतात, असे निरीक्षण हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी नोंदविले आहे.

‘रिस्क फॅक्टर’ कमी करा
स्वत:चे जोखीम घटक (रिस्क फॅक्टर) कमी करण्यावर भर द्यावा. रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवावा. योग्य आहार घ्यावा. लोकरीचे कपडे घालावे. सोबतच नियमित व्यायाम आणि ज्यांना जुने आजार आहे त्यांनी, ‘इन्फ्ल्यूएंजा’ आणि ‘निमोकोकल’ लसी घ्याव्यात.

‘क्लॉट’ बनण्याची शक्यता वाढते
थंडीच्या दिवसांत ‘क्लॉटिंग फॅक्टर’ अधिक कार्यरत असल्याने गुठळी (क्लॉट) बनण्याची शक्यता अधिक असते. थंडीत जर ‘इन्फेक्शन’ झाले, तर हृदयावर ताण पडू शकतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ज्यांना हृदयविकाराचा अधिक धोका आहे, जसे अनियंत्रित मधुमेह व उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशांना हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो. थंडीत व्यायाम व शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते व हृदयविकाराची शक्यता वाढते.

थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याशिवाय घाम कमी येतो. त्यामुळे रक्तदाबात वाढ होते. यामुळे हृदयावर ताण येतो. अशा वेळी हृदयांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये असलेली ब्लॉकेजेस तुटून तेथे गुठळी (क्लॉट) बनते व हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here