असं म्हटलं जातं की, एका यशस्वी पुरूषामागे एका महिलेचा हात असतो. कारण ती सुद्धा त्याना यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करते. पडद्यामागे राहून पुढे जाण्यासाठी पूर्ण ताकद लावते. पण अनेकदा त्यांना त्याचं श्रेय दिलं जात नाही ज्यावर त्यांचा अधिकार असतो.
मात्र, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीला असं गिफ्ट दिलं आहे जे ती आयुष्यभर विसरणार नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनचा माजी बॉडीगार्ड आणि सेल्फ डिफेंस एक्सपर्ट मॅट फिडेस (Matt Fiddes) आपल्या पत्नीला तिच्या मेहनतीचं बक्षीस म्हणून असं गिफ्ट दिलं ज्याची चर्चा होत आहे.
स्वत:च्या मेहनतीने कोट्याधीश बनलेल्या मॅटने पत्नी मोनिकेला 8 महिन्यात 2 फरारी कार गिफ्ट केल्या. त्याला या गाड्यांची इतकी आवड आहे की, जेव्हाही नवीन गाडी लॉंच होते तो खरेदी करतो. सोबतच त्याने तिला कोट्यावधी रूपयेही दिले आहेत