0
17

दैनिक ठाणे व अक्षरमंचतर्फे पुस्तक परीक्षणाला गौरव :मेघा कोल्हटकर SP-9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशन कार्याध्यक्ष यांना लेखन क्षेत्रातील २२ वा सन्मान..

एसपी नाईन प्रतिनिधी श्रीकांतत शिंगे

कल्याण, मुंबई – साहित्य, सामाजिक भान आणि निर्भीड मांडणी यांचा सुरेख संगम असलेल्या एका प्रेरणादायी पुस्तक परीक्षणाला प्रतिष्ठित दैनिक ठाणे व अक्षरमंच यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी कल्याण, मुंबई येथे होणाऱ्या विशेष समारंभात हा गौरव प्रदान केला जाणार आहे. या सर्वोच्च सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत एसपी नाईन मराठी न्यूज चॅनल रत्नागिरीच्या संपादक व एस पी नाईन मीडिया निर्सौभया वुमन असोशियन कार्याध्यक्ष. मेघा मिलिंद कोल्हटकर. विविध क्षेत्रांतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आतापर्यंत त्यांना तब्बल ४० सन्मान प्राप्त झाले असून, त्यापैकी लेखन क्षेत्रातील हा २२ वा गौरव आहे.सौ. मेघा कोल्हटकर या पत्रकारिता, समाजकार्य, महिलासबलीकरण, ग्रामीण प्रश्न, महिला-युवा सक्षमीकरण आणि प्रबोधनात्मक लेखनासाठी राज्यभर परिचित आहेत. त्यांच्या लेखनात केवळ शब्दांची रचना नसून, समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब, वंचितांचा आवाज आणि परिवर्तनाची दिशा दिसून येते. सखोल अभ्यास, तथ्यपूर्ण मांडणी, संवेदनशील दृष्टिकोन आणि प्रभावी भाषाशैली यामुळे त्यांचे पुस्तक परीक्षण इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे.सदर पुरस्कारप्राप्त पुस्तक परीक्षणाने साहित्यकृतीच्या आशयाची चिकित्सक मांडणी करताना तिचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक अन्वयार्थ अत्यंत नेमकेपणाने विशद केला आहे. वाचकांना पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोहोचायला मदत करणारी ही समीक्षा असून, त्यातील स्पष्ट निरीक्षणे व अभ्यासपूर्ण विवेचनामुळे परीक्षक समितीने याची विशेष दखल घेतली.मेघा कोल्हटकर या सध्या *एसपी नाईन मराठी न्यूज चॅनल, रत्नागिरी* येथे संपादक म्हणून कार्यरत आहेत. *एस. पी. नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सागर पाटील* यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य त्यांना लाभत असून त्यामुळेच त्यांच्या कार्याला अधिक दिशा व बळ मिळाले आहे. वृत्तपत्रीय, डिजिटल माध्यमांची जाण, सामाजिक भान आणि साहित्यिक दृष्टी यांचा संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.या सन्मानामुळे केवळ मेघा कोल्हटकर यांचाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे. साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना, तरुणाई, सहकारी आणि वाचक वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी हा पुरस्कार त्यांच्या अखंड परिश्रम, चिकाटी आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेचा मान असल्याचे मत व्यक्त केले आहे.पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या,“हा सन्मान केवळ माझा नाही, तो वाचकांचा, माझ्या सहकाऱ्यांचा आणि समाजाचा आहे. शब्दांमधून परिवर्तन घडवता येते, हीच माझी ताकद आणि प्रेरणा आहे. भविष्यातही अधिक जबाबदारीने, अधिक प्रामाणिकपणे लेखन व पत्रकारिता करत राहीन.”या गौरवप्राप्तीमुळे लेखन क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवोदित लेखक, पत्रकार व साहित्यप्रेमींनाही नवा प्रेरणास्त्रोत मिळाला असून, त्यांच्या कार्यातून समाजासाठी अधिक संवेदनशील, जागरूक आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम पिढी घडावी, अशी भावना साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.**भविष्यातही सौ. मेघा मिलिंद कोल्हटकर यांच्या हातून असेच प्रेरणादायी कार्य घडत राहो आणि त्यांच्या लेखणीतून समाजपरिवर्तनाची नवी वाट तयार होत राहो, हीच सर्वांची मनःपूर्वक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here