उज्वला लाड :- आंबा प्रतिनिधी
आंबा: बदलत्या वातावरणामुळे शेती अडचणीत येत आहे.पाऊस कमी झाला आहे.अश्या वेळी पाण्याने समृध्द असणाऱ्या नद्याचे संवर्धन व जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलून नद्यांचे प्रदूषण रोखण्याची गरज एम.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ.व्हि.टी.पाटील यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त केंद्र शाळा माण येथे आयोजित केलेल्या नदी संवर्धन जनजागृती शिबीरात ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी कडवी नदी पुर्नजीवन समितीचे प्रमुख राजेंद्र लाड होते.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख संजय जगताप यांनी केले.
यावेळी पदवीधर शिक्षक संभाजी लोहार यांनी नदी स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.यावेळी जनजागृती पत्रके वाटण्यात आली.यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे सहकार्य लाभले.
चौकटीसाठी (गोठणे ग्राम पर्यटन उभारणीत प्रत्येक घराच्या दारी सत्तावीस नक्षत्रांची झाडे लावून अभयारण्यग्रस्थ वसाहतीत शोसखड्डे उभारणी कामास प्रारंभ करण्यात आला. या कामी डॉ व्हि.टी.पाटील फाउंडेशन कोल्हापूर या सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले)
फोटो ओळी शाहूवाडी: येथील केंद्र शाळा माण येथे नदी संवर्धन जनजागृती शिबीरात मार्गदर्शन करताना एम.आर.पाटील, केंद्रप्रमुख संजय जगताप.