प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: राज्य मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील हा ६२२ गुण मिळवत राज्यात प्रथम आला असून उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी ,तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. यामध्ये विनायक पाटील यांनी केलेल्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उपजिल्हाधिकारी, डीव्हायएसपी तहसीलदार या संवर्गातील ६१३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. १८ जानेवारी २०२४ गुरुवारीच परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती.
त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आले होते. तर आता मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या परीक्षेत कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटीलन बाजी मारली आहे. विनायक पाटीलनं ६२२ गुण मिळवत मुलांमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
तर धनंजय पाटील ६०८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींंमध्ये पूजा वंजारी पहिली आली आहे. तिला ५७०.२५ गुण मिळाले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधील मुदाळ गावचा रहिवासी असलेला विनायक पाटील याचे आई वडील हे दोघेही शेती करतात.
घरची परिस्थिती ही मध्यमवर्गीय असल्याने त्याला लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड होती. मोठ होऊन सरकारी अधिकारी बनाव असं त्याच आणि आई-वडिलांच स्वप्न होत. विनायक पाटील याचं बारावीपर्यंतच शिक्षण गावातच आबा पाटील महाविद्यालय येथे पूर्ण झाल. बारावी मध्ये देखील त्याने ९३ टक्के गुण मिळवत यश संपादन केलं.
यानंतर २०२१ आली त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएसी स्टॅटिटिक्स मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती.
२०२१ साली झालेल्या राज्यसेवा परीक्षेत त्यांनी पहिल्या प्रयत्नात ५५३ मार्क घेत उत्तीर्ण होत विक्रीकर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती. तर सध्या उपशिक्षणाधिकारी म्हणून नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. विनायक पाटील याने केलेल्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने त्यांच्याशी बातचीत करताना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आज जाहीर झालेल्या निकालावरून पहिल्या पाच मध्ये येण्याची अपेक्षा होती. मात्र राज्यात प्रथम आल्याने मला आणि आई वडिलांना आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया विनायक पाटील यांनी दिली आहे.