लग्नानंतरही अभ्यासात सातत्य ठेवत ;सोबत कुटुंबाची भक्कम साथ अन् सांगलीची पूजा वंजारी मुलींमध्ये राज्यसेवा परिक्षेत राज्यात आली प्रथम.

0
93

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विनायक पाटील यांनी ६२२ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवला.

पाटील यांनी हे यश बावीसाव्या वर्षी मिळवले असून, दुसऱ्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे. या निकालात धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

त्याचप्रमाणे मुलींमधून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पूजा वंजारी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.एमपीएससीने परीक्षेबाबतची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६२३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते.

मात्र, एमपीएससीच्या प्रशासनाने नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील मुलाखती संपल्यानंतर, एका तासानंतर निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांना सुखद धक्का मिळाला आहे.

या निकालाच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीत १८३० उमेदवारांचा समावेश आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here