कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार; ब्लॅकमेल करत पैसे उकळले

0
224

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :तिघांना अटक पाचगाव येथील घटना. सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीतून सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लॉजवर नेऊन तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. त्यानंतर प्रेमसंबंध व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला घरातून दागिने आणण्यास भाग पाडले.

अशा प्रकारे या तरुणीकडून सहा लाख रुपये किंमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने लुबाडले या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सराफ कारागिरासह तिघांना अटक केली आहे. करवीर तालुक्यातील पाचगावात हा प्रकार घडला.

अत्याचार करणारा आदिनाथ विजय उगळे (वय २५, रा. अमृतनगर, गिरगाव रोड, पाचगाव, ता. करवीर), त्याचा मित्र तन्मय राजाराम सुतार (वय २०, रा. नंदगांव, ता. करवीर), सराफ कारागीर रोहित मधूकर काळे (वय २५, रा. गाडगिळ कॉलनी, शांतीनगर, पाचगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आदिनाथ उगळे व अल्पवयीन मुलगी यांची सोशल मिडीयावरून ओळख झाली. या ओळखीतून तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलीच्या कौटूंबिक पार्श्वभूमीचा अंदाज घेऊन तिला लुटण्याचा प्लॅन केला. या तरुणीस लॉजवर नेऊन तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. तिची बदनामी करण्याची भिती दाखवून पिडीत तरुणीला तिच्या घरातून दागिने चोरून आणण्यास सांगितले. घाबरलेल्या तरुणीने आपल्या आईचे सोळा तोळे सोन्याचे दागिने चोरून आणून ते आदिनाथ उगळेला दिले.

सध्या मी कर्जबाजारी आहे, पैशाची गरज आहे. थोड्या दिवसांसाठी तुझ्या आईचे दागिने आणून दे, ते गहाण ठेवून पैसे घेतो, पैशाचा बंदोबस्त झाल्यानंतर मी दागिने परत करतो असे सांगून आदिनाथने पिडीत तरुणीला भुलथापा मारल्या होत्या. असे पोलीस तपासात उघड झाले. तरुणीने दागिने परत मागितल्यानंतर त्याने नकार दिला. तसेच कुटुंबियांना मारण्याची धमकीही दिल्याचे बोलले जाते.

पीडित तरुणीने प्रारंभी तन्मय सुतार याच्याविरुध्द तक्रार दिली होती. पोलीसांनी त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर मुख्य संशयित आरोपी आदिनाथ उगळे असल्याचे स्पष्ट झाले.

उगळे याने सोन्याचे दागिने सराफ कारागीर रोहित काळे याच्याकडे मोडले होते. त्यालाही या गुन्ह्यात अटक केली आहे. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here