कसबा सांगावमध्ये घोडागाडा शर्यत स्पर्धेच्या वेळी जीप पलटली होऊन ; ७ ते ८ जण जखमी

0
191

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर :कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झालाय. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती.

अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले ८ ते १० जण थेट जीपखाली आल्याने सर्व जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here