प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरीकांचे सर्वेक्षण मंगळवार दि.२३ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे
सर्वेक्षण हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखानवार यांनी दिली आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखानवार म्हणाले मराठा समाजाचे मागासलेपण तपासले जाणार आहे. यासाठी राज्यातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरीकांचे सर्वेक्षण होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यास्तरावर १ नोडल अधिकारी व १ सहाय्यक नोडल अधिकारी त्याचबरोबर तालुका स्तरावर १२ नोडल अधिकारी, व १२ सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे कामकाज पुर्ण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ४४ इतक्या प्रगणकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४०१ सुपरवाझराची नियुक्ती करण्यात आली आहे.