‘बिग बॉस 17’चा विजेता कोण होणार? फिनाले एपिसोडपूर्वीच ‘Top 5’ स्पर्धकांच्या नावाचा खुलासा

0
97
'बिग बॉस 17'चा विजेता कोण होणार? फिनाले एपिसोडपूर्वीच 'Top 5' स्पर्धकांच्या नावाचा खुलासा

सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कायम चर्चेत असतो. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ‘ बिग बॉस 17’ चा विजेता कोण होणार?

याबद्दल अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. या कार्यक्रमासंदर्भात नवनवे अपडेट समोर येत आहेत.

बिग बॉसच्या चाहत्यांकडून ‘Top 5’ स्पर्धकांमध्ये कोणाचे नाव असेल आणि कोण घराबाहेर पडेल याचे अंदाज बांधले जात आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत. फिनाले विकमध्ये सहा जण पोहचले आहेत. यात . मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, विकी जैन, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी यांचा समावेश आहे. तर ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार मुनव्वर, अंकिता, अभिषेक, विकी , मन्नारा हे ‘बिग बॉस 17’चे ‘टॉप 5’ स्पर्धक आहेत. ऑरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 17’चा विजेता मुनव्वर फारुकी होऊ शकतो. तर अंकिता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘बिग बॉस हिंदी’चं १७वं पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. आता काहीच दिवसात २८ जानेवारीला या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ‘बिग बॉस १७’ च्या विजेत्याला ट्रॉफीबरोबरच लाखो रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. यासोबतच स्पर्धकाला आलिशान कारदेखील मिळणार आहे. ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर कलर्स टीव्हीवर डान्स शो ‘डान्स दिवाने’ सुरू होणार आहे. या शोचा ग्रँड प्रीमिअर 3 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे.

‘बिग बॉस 17’मधून सोनिया, मनस्वी, जिग्ना व्होरा, सनी आर्या, रिंकू धवन, खानझादी, सना रईस खान, ऑरा, समर्थ जुरेल, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, अनुराग डोवाल, नवीद सोल, आयशा खान आणि ईशा मालवीय हे बेघर झाले. आता येत्या काही दिवसांंमध्ये बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here