अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा फोटो

0
57

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडिया सक्रिय आहे, ते नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर ब्लॉगच्या माध्यमांतून ते आपल्या चित्रपटातील कामाचा अनुभव फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमांतून चाहत्यांशी शेअर करत असतात.

अशात त्यांनी पुन्हा एकदा ब्लॉगच्या माध्यमांतून आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहे, नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहे.

ब्लॉगमध्ये त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच्या गोड आठवणी सांगितल्या. यासह एक जुना फोटो शेअर केला, ज्यात रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर यांच्यासह ७० च्या दशकातील दिग्गज दिसतेय.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात माइक दिसतोय आणि ते प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहेत, तर विनोद खन्ना, कल्याण आणि राज कपूर त्यांच्यासोबत स्टेजवर उभे आहे.

या फोटोत रणधीर कपूर, मेहमूदही दिसत आहेत. दूर कोपऱ्यात शम्मी कपूर आणि रेखा उभे आहे. सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींने एका छताखाली एकत्र आणणारा हा कदाचित लाइव्ह कार्यक्रम होता.

या फोटो रेखा दिसत असल्यामुळे अमिताभ आणि रेखा यांचे फॅन्स या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत आहे. तर अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर केला, पण त्या फोटोमागची गोष्ट नंतर सांगणार असल्याचं त्यांनी लिहिलं. रविवारी रात्री हा फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर करताना ते म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी गोष्ट आहे… ती कधीतरी सांगेन.” त्यामुळे चाहते आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अंदाज बांधत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here