नाशिकच्या गोदाघाटावर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, ठाकरेंच्या दौऱ्यावेळी नेमकं काय घडलं?

0
70

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन सहकुटुंब श्रीरामांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते गोदाघाटावर महाआरतीसाठी दाखल झाले.

उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात पूजा केल्यानंतर ते गोदातीरी गेले. पण गोदाघाटावर यावेळी प्रवेशासाठी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेट्स आणि मेटल डिटेकटर तोडून गोदा घाटावर प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

शिवसैनिकांची यावेळी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. शिवसैनिक मोठ्या संख्येत गोदा घाटावर दाखल झाले.

यावेळी आयोजकांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गोदा घाटावर दाखल झाले. अतिशय मनोभावे यावेळी गोदातीरी पूजा करण्यात आली. पुजाऱ्यांकडून यावेळी मंत्रोच्चार करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

उद्धव ठाकरे आज दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा नियोजित दौरा आहे. त्यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन सहकुटुंब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते आज गोदातीरी आले. त्यांनी गोदारीती महाआरती केली. त्यानंतर उद्या त्यांची नाशिकमध्ये भव्य सभा पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here