हिवाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. या ऋतूमध्ये सर्दी, ताप ,खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. तेव्हा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी 5 पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो.
मसाला चहा : हिवाळ्यात मसाला चहा आरोग्यासाठी चांगला ठरतो. चहा बनवताना त्यात वेलची, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तेजपत्ता आणि चक्रफुल इत्यादी मिक्स करून टाकल्याने चहा अतिशय चवदार आणि पौष्टिक बनतो. मसाला चहा प्यायल्याने शरीराला उब मिळते. मसाला चहा आरोग्यासाठी चांगला असला तरी दिवसातून 2 ते 3 कपच्यावरती त्याचे सेवन करू नये.
गाजर मुळ्याचा सूप : हिवाळ्याच्या दिवसात गाजर मुळ्याचा सूप पौष्टिक ठरतो. अनेकजण गाजर आणि मुळा इत्यादी सॅलडमध्ये खातात परंतु याच सूप बनवून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
मसाला गूळ : हिवाळ्याच्या दिवसात गुळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु सध्या गुळाच्या तुलनेत मसाला गूळ हा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये गुळासोबत सुंठ, तूप, आलं इत्यादी गोष्टी असतात. तेव्हा हिवाळ्यात मसाला गूळचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
तिळाचे लाडू : हिवाळ्याच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्यासाठी तिळाच्या लाडवांचे सेवन फायदेशीर ठरते. तीळ हा उष्ण पदार्थ आहे. तेव्हा तिळाचा वापर करून विविध रेसिपी तयार केल्यास आरोग्यासाठी पौष्टिक ठरेल. दररोजच्या आहारात तिळाचा समावेश व्हावा यासाठी तुम्ही तिळाचे लाडू, तिळाची चिक्की इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.
पालेभाज्या : हिवाळ्याच्या दिवसात पालेभाज्या खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. तेव्हा पालेभाज्यांपासून तुम्ही विविध पदार्थ बनवून त्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.