तुरुकवाडी येथील मॅरेथॉन स्पधेॅत कापशीचा  सिध्देश कदम प्रथम

0
437

SP9 / कोकरूड प्रतापराव शिंदे

तुरुकवाडी ता. शाहुवाडी येथे डॉ. एस. एन. पाटील फाऊंडेशन व आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दहा किलोमीटर  मॅरेथॉन स्पधेॅत कापशीचा सिध्देश विकास कदम याने प्रथम क्रमांक, कराड येथील अर्थव शंकर ताटे याने द्वितीय, वारुळ येथील रोहित प्रकाश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना रोख रक्कम पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  एकांक सावंत यांच्या हस्ते  झेंडा दाखवून स्पधेॅचे  प्रारंभ झाला.

यावेळी डॉ. एस. एन. पाटील, ॲड. सतिश माईंगडे, डॉ. पंकज पाटील, लक्ष्मण पाटील प्रमुख उपस्थित होते. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास हिरकणी स्पोर्ट्स कराडचे प्रशिक्षक अतुल पाटील, डॉ. एस. एन . पाटील सहकारी पतसंस्थेचे संचालक डॉ. पंकज पाटील, आनंद माईंगडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश माईंगडे सचिव सचिन माईंगडे, एकांक सावंत, जे. एस. पोतदार, लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील, मुख्याध्यापिका लता  हारुगडे, दिप्तीताई माईंगडे, स्नेहा सावंत ,प्रमोद पाटील आदींसह दत्तसेवा विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here