वनप्लसने नुकतेच आपले दोन लेटेस्ट फ्लॅगशिप फोन लॉन्च केले आहेत. सीरीजमध्ये वनप्लस 12 आणि वनप्लस 12R उपलब्ध आहे. इव्हेंटमध्ये वनप्लस बड्स 3 लॉन्च केलेय. आता माहिती मिळाली आहे की, कंपनी वनप्लस 12R ची स्पेशल अॅडिशन Genshin Impact सादर करतेय.
जी ग्लोबली 28 जानेवारीला लॉन्च केली जाईल. ही स्पेशल अॅडिशन इलेक्ट्रो वायलेट कलरमध्ये लॉन्च केली जाईल. ज्यामध्ये यूनिक डिझाइन इलिमेंट मिळतील. सॉफ्टवेअर अपग्रेड आणि वेगळ्या लूकसोबतच फोन प्रत्येक बाबतीत वनप्लस 12R प्रमाणे असेल.
स्टँडर्ड वनप्लस 12R च्या 8GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 16GB रॅम/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 45,999 ठेवण्यात आली आहे. या फोनच्या ओपेन सेल 6 फेब्रुवारीपासून सुरु होईल. स्टँडर्स वनप्लस 12R मध्ये LTPO4.0 च्या सपोर्टसह 6.78-इंचांचा AMOLED ProXDR डिस्प्ले देण्यात आलाय. ज्याचा अर्थ असा होतो की, अॅप चालवण्याच्या आधारावर स्मार्टफोन 1-120Hz पर्यंत रिफ्रेश रेटवर चालू शकतो.
कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह येतो. जो सर्व ग्राफिक्स टास्कसाठी अॅड्रोनो 740 जीपीयूसोबत जोडला गेलाय. वनप्लस 12R 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह येतो. कॅमरा म्हणून या फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो मिळतो.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना या लेटेस्ट स्मार्टपोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आलाय. पॉवरसाठी वनप्लस 12R मध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही 100W SUPERVOOC चार्जरसह येते.