आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत डॉ.प्रा. विजय काळेबाग यांना मातृशोक
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, वक्ते, लेखक, मार्गदर्शक, आंबेडकराइट स्टुडंट्स फेडरेशनचे संस्थापक डॉ. विजय काळेबाग यांच्या मातोश्री श्रीमती गांधारीबाई सोपान काळेबाग यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी येडे-उपाळे ता. कडेगाव,जि. सांगली येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारातून त्यांनी आपली मुले सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणारी अशी घडवली.
गावामध्ये काळेबाग कुटुंब हे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित मानले जाते. अशा या प्रतिष्ठित कुटुंबाला उभा करणारी व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यामागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.