कानात दिसतं Heart Attack चं हे ‘सायलेंट’ लक्षण, छातीत दुखण्याच्या खूप आधी मिळतो संकेत

0
59

Heart Attack : हे सगळ्यांनाच माहीत आहे की, हार्ट अटॅक एक सायलेंट किलर आहे. कारण तो येतो तेव्हा पत्ताही लागत नाही. हार्ट अटॅकचे संकेत एकदम शेवटी दिसतात, जसे की, छातीत वेदना, जबडा दुखणे, खांदे दुखणे, श्वास भरून येणे इत्यादी.

पण काही अशाही समस्या आहेत ज्यांना हार्ट अटॅकच्या सुरूवातीच्या लक्षणाच्या रूपात बघितलं जातं. यातील एक लक्षण कानात दिसून येतं.

हार्ट अटॅकचं सुरूवातीचं लक्षण

छातीत वेदना यासारख्या लक्षणाआधीही काही लक्षणं दिसतात. जे लगेच ओळखून जीव वाचवला जाऊ शकतो. ही समस्या एखाद्या दुसऱ्या कारणानेही होऊ शकते. पण याचा संबंध हृदरोगाशीही बघण्यात आला आहे. कानात जडपणा हा असाच एक इशारा आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

कानात जडपणा आणि वेदना

एअर प्रेशर कमी किंवा जास्त झाल्यावर कान बंद होणं सामान्य स्थिती आहे. अनेकदा थंडीच्या दिवसात कानात वेदना होतात. जर हे विनाकारण किंवा नेहमी होत असेल तर यामागे हृदयाच्या नसा होत असतात. ज्यात समस्या झाली तर हार्ट अटॅक येतो.

डाव्या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज

एनसीबीआयवर एक रिसर्च आहे जो पाकिस्तान आणि अमेरिकेतील अभ्यासकांनी मिळून केला. या रिसर्चमधून समोर आलं की, वेगस नर्वच्या ऑरिक्यूलर ब्रांचच्या विकारामुळे कानात वेदना आणि जडपणा जाणवू शकतो. हा विकार डाव्या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉके़ज आल्यावर होऊ शकतो आणि यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

कानावर सुरकुत्या

हार्ट अटॅकचं अजब लक्षण सुरकुत्यांसंबंधी आहे. जी तुमच्या ईअर लोबवर दिसते. याला फ्रैंक साइनही म्हटलं जातं जे ट्रैगसपासून ऑरिकलपर्यंत पसरलेलं असतं. पण याचे आणखी पुरावे मिळणं बाकी आहेत. हे वय वाढण्याचंही लक्षण असू शकतं.

या गोष्टींमुळे वाढतो धोका

– स्मोकिंग

– हाई फॅट डायट

– डायबिटीस
– हाय कोलेस्ट्रॉल

– हायपरटेंशन

– लठ्ठपणा

लाइफस्टाईलमध्ये बदल

1) स्मोकिंग आणि दारू सोडा

2) ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवा

3) ब्लड शुगर वाढू देऊ नका

4) एक्सरसाइज करा आणि लठ्ठपणा कमी करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here