Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीत आठवडाअखेर वाढ; आता काय आहेत भाव

0
49


सोने-चांदीच्या किंमती(Gold Silver Price Today 27 January 2024)

सोन्यात किंचित वाढ

जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोन्यात मोठी घसरण झाली. तर आठवड्यातील काही दिवसात मौल्यवान धातूने चढाई केली.

या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली. तर 26 जानेवारी रोजी किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी तीन दिवसांत सूसाट

या महिन्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत घसरण झाली. 23 जानेवारी रोजी 500 रुपयांची स्वस्ताई आली.

तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. 26 जानेवारी रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. तीन दिवसांत एकूण 1800 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले.

18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा.

प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here