होय, आम्ही मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे वंशज! ‘वंशावळ’ दाखवत राजस्थानातील राजघराण्याचा दावा

0
87

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. 500 वर्षाच्या वनवासानंतर रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झाल्याने देशभरात दिवाळी साजरी केली गेली.

यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. संपूर्ण देश यानिमित्ताने राममय झालेला असताना राजस्थानमधील एका राजघराण्याने आम्ही मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे वंशज असल्याचा दावा केला आहे. सूर्यवंशी राजपूत घराण्याचे महाराज सवाई पद्मनाथ सिंह (Maharaja Padmanabh Singh) यांनी हा दावा केला असून पुरावा म्हणून त्यांनी वंशावळही दाखवली आहे.

अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही महाराज सवाई पद्मनाथ सिंह उपस्थित होते. हा सोहळा पार पडल्यानंतर ‘द रॉयल फॅमिली ऑफ जयपूर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. तसेच आपण प्रभू श्रीरामाचे वंशज असल्याचा दावा करत त्यांनी वंशावळही शेअर केली आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सूर्यवंशी राजपूत घराण्याचे महाराज सवाई पद्मनाथ सिंह हे प्रभू श्रीरामाचे 309 वे वंशज असून त्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यासोबत 18 व्या शतकामध्ये कापडावर काढण्यात आलेली वंशावळ आणि अयोध्येचा ऐतिहासिक नकाशाही शेअर करण्यात आला आहे. हा नकाशा त्याकाळी महाराज सवाई जयसिंह द्वितीय यांनी एका साधूकडून विकात घेतला होता. हा नकाशा सूर्यवंशी राजपूत घराण्याने पिढ्यानपिढ्या जपला आहे.

हजारो कोटींचे मालक

महाराज सवाई पद्मनाभ सिंह हे 25 वर्षाचे आहेत. राजकुमारी दिया कुमार आणि नरेंद्र सिंह यांचे पुत्र असलेले पद्मनाभ सिंह हजारो कोटींचे मालक आहेत. विदेशात शिक्षण घेतेल्या पद्मनाभ यांना फिरायलाही आवडते. जवळचे लोक त्यांना पाचो या नावाने हाक मारतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here