मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचं अल्पशा आजाराने निधन

0
146

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

सांगली :शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख आहे. अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. न्यूमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते.सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा अनिल बाबर यांनी २०१९ ल३ पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.शिवसेनेत फूट पडल्यापासून अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरवातीपासून खंबीर साथ दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here