कोल्हापूर प्रतिनिधी:
दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसातीमध्ये मस्जिदवर महापालिकेचा मोठा फौज फाटा पोलीस बंदोबस्तात धडकला.यावेळी स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्याने लाटी चार्ज करण्याची भाषा डीवायएसपी यांनी केल्याची माहिती समोर आले आहे. 2 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने अपीलावर सुनावणी ठेवली असताना आजच कारवाई करण्याची महानगरपालिकेला घाई असल्याचा आरोप स्थानिक हिंदू- मुस्लिम नागरिक करत आहेत.