अंकिता लोखंडेचा ‘नो मेकअप’ लूक पाहून घाबरले नेटकरी; म्हणाले ‘हे तर भयानक’

0
57

अंकिता लोखंडेनं ‘पवित्र रिश्ता’ या पहिल्यावहिल्या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेत तिची सुशांत सिंह राजपूतसोबत चांगली जोडी जमली होती. अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही अंकिताचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 52 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अंकिताचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमधील तिचा नो मेकअप लूक पाहून नेटकरी अक्षरश: घाबरले आहेत. अंकिताला पहिल्यांदाच असं पाहिलं गेलं आहे. ‘हे तर खूपच भयानक’ असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अंकिताची खास मैत्रीण अशिता धवनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अशिताने पोस्ट केलेला अंकिताचा हा व्हिडीओ ‘बिग बॉस 17’च्या घरात जाण्यापूर्वीचा आहे. बिग बॉसमध्ये एण्ट्री करण्याच्या एक दिवस आधी अंकिताचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी तिला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी केकसुद्धा कापला होता. याच पार्टीतील अंकिताचा व्हिडीओ अशिताने पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here