श्रीधर पाटील डीकेआर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

0
80

SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे

तुरुकवाडी- पाटीलवाडी ता. शाहुवाडी गावचे सुपुत्र व काश्मीर येथे कार्यरत असणारे पोलीस अधिकारी श्रीधर दौलू पाटील यांची काश्मीर येथे वाहतूक नियंत्रक विभागाकडून डोडा, किश्तवार, रामबन, म्हणजेच डीकेआर परिक्षेत्रात बदली झाली आहे.

सध्या ते विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ते गेली दहा वर्षे जम्मू आणि काश्मीर येथे पोलीस दलात उलेखनीय कामगिरी करत आहेत.

त्यांनी आत्तापर्यंत अति संवेदनशील भागात धाडसी मोहीमा राबवून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. येथील जंगल दऱ्याखोऱ्यातील वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.


कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्रीधर पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिराळा- शाहुवाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here