यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. सध्या जिल्ह्यात फक्त १२० दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा चारा हा इतर जिल्हा व राज्यात विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ व १०२१ महसुली मंडळात दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर झाली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, सांगोला, मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यातही चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर राज्यामध्ये विक्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कृषी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रिक माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनास पुढील १२० दिवस म्हणजेच मे २०२४ अखेर पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तयार होणारा चारा इतर जिल्हा व राज्यात विक्रीसाठी बंदी आणण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुलै २०२४ अखेर बंदी लागू
जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम १४४4 नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील उत्पादीत होणारा चारा यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई केली आहे. जुलै २०२४ अखेर ही बंदी लागू असणार आहे.