नवरा माझा नवसाचा 2 मधून प्रेक्षकांना खास सरप्राइज,’हा’ अभिनेता प्रमुख भूमिकेत

0
49

मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक सिनेमे आहेत जे कधीही आणि केव्हाही पाहिले तर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. हे सिनेमे हजार वेळा पाहिलं तरी कंटाळवाणे वाटत नाहीत. त्यातील पात्र, पात्राचे अभिनय या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

असाच एक सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा. 2004 साली आलेल्या या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, अभिनय अशा सगळ्या धुरा सांभाळणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर नवरा माझा नवसाचा 2 घेऊन येत आहेत. नुकतीच सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे.

सिनेमात कोण कोण कलाकार असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. पहिल्या सिनेमातील तगडी स्टारकास्ट दुसऱ्या पार्टमध्ये असणार आहे यात काही शंका नाही. पण काही नवे चेहरे देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अभिनेता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये दिसणार आहे.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी सिनेमाच्या क्लापबोर्डचा फोटो शेअर करत ‘नवरा माझा नवसाचा 2’ ची माहिती सर्वांना दिली. 4 फेब्रुवारी पासून सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे.

जयवंत वाडकर यांनी नवरा माझा नवसाचा सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. बाबू कालियाचं स्केच वॅकीकडून करून घेण्यात जयवंत वाडकर यांची मदत झाली होती. दुसऱ्या भागात जयवंत वाडकर काय धम्माल आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही लहान वयात सुरू केलं काम, बनली TVची लाडकी सून; 24व्या वर्षी अभिनेत्रीनं करून दाखवली मोठी गोष्ट

जयवंत वाडकर यांच्याबरोबरच मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्निल जोशी देखील सिनेमात दिसणार आहे. स्वप्निलनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. स्वप्निल जोशी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

“सरप्राइज. १९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2’ गणपती बाप्पा मोरया! शुटींगला सुरूवात!” असं म्हणत स्वप्निलनं गणपतीपुळ्याच्या गणपतीचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here