भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकी आपली नवीन स्विफ्ट हॅचबॅक लॉन्च करण्याची तयारी करतेय. कंपनीने गेल्या वर्षी ही टोकयो मोटर शोमध्ये लॉन्च केली आहे. आता ही कार भारतातही लॉन्च करण्याची तयारी सुरु आहे.
नवीन स्विफ्टमध्ये डिझाइन अपडेट मिळेल. यासोबतच ही कार अनेक अडव्हान्स्ड फीचर्ससह येईल. असंही सांगितलं जातंय की, कंपनी याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम आणि 6 एअरबॅगसारखे सेफ्टी फीचर्सही देऊ शकते.
गेल्या वर्षी जापानमध्ये लॉन्च झालेल्या स्विफ्टच्या नव्या मॉडलविषयी बोलायचं झाल्यास यामध्ये कंपनी नवीन Z-सीरीज इंजनचा वापर करतेय जे हायब्रिड टेक्नॉलॉजीचा उपयोग करते. यामुळे कारचं मायलेज वाढवणे आणि प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त ही कार ऑल-व्हील-ड्राइव्हचा पर्यायही देते. जी याला अधिक उपयोगी बनवते.
नवीन फीचर्ससह येईल अपकमिंग स्विफ्ट
नवीन स्विफ्टची डिझाइनही खूप आकर्षक आहे. ही कार एलईडी प्रोजेक्टर हेडलँप्स, डीआरएल, फ्लोटिंग टाइप रुफ, ड्यूअल-टोन अलॉय व्हील्स आणि क्लिअर लेन्स टेललॅंप्ससारख्या फीचर्ससह येते. याचं इंटीरियरही खूप सुंदर आणि फंक्शनल आहे. यामध्ये 9-इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग आणि एडीएएस टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. खरंतर भारतात ADAS आणि 6 एअरबॅग केवळ टॉप व्हेरिएंटमध्येच मिळण्याची आशा आहे.
इंजिनही झालं नवं
नवीन स्विफ्टच्या जापानी व्हर्जनमध्ये 1.2-लीटर, 3-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड Z सीरीज पेट्रोल इंजिन लावलं गेलंय. जे माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येते. आशा आहे की, भारतातही ही कार एसी इंजिनसह येऊ शकते. या हॅचबॅकचा जापानी व्हर्जन मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑप्शन्ससह येतो. तर मॅन्युअल व्हर्जनसह AWD फीचरही देण्यात आलंय. खरंतर भारतात नवीन स्विफ्ट 5-स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्स ऑप्शन आणि विना AWD सेटअपसह येऊ शकते.
टेस्टिंग दरम्यान दिसली कार
नवीन स्विफ्ट अनेकदा रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. याचं फ्रंट प्रोफाइल नवीन बंपरसह पूर्णपणे बदललं आहे. तर साइड प्रोफाइलविषयी बोलायचं झाल्यास, आता रियर डोअर हँडल सी-पिलर ऐवजी डोअरवर दिले गेलेय. फ्रंटप्रमाणे स्विफ्टचा मागचा भागही रीडिझाइन करण्यात आलाय. यामध्ये एलईडी एलिमेंट्ससह क्लिअर लेन्स टेललँप्स असू शकतात. नवीन स्विफ्टमध्ये 5 स्पोक अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. कंपनी नवीन स्विफ्टला नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये लॉन्च करु शकते.