देवाळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावात विद्युत वितरण विभागाचे अधिकारी ग्राहकांसाठी आहेत की नेते मंडळी साठी आहेत अशी शंका निर्माण होत आहे
याला कारण म्हणजे नारायण मधुकर माने मुक्काम पोस्ट देवाळे यांची विद्युत वितरण करणारी सर्विस वायर शेजारच्या बांधकामासाठी काढून दोन महिने उलटले तरी अजून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं नावच घेत नाहित.
नारायण मधुकर माने राहणार देवाळे तालुका पन्हाळा यांचे यांचे गावांमध्ये घर आहे. त्यांच्या शेजाऱ्यांचे बांधकाम सुरू आहे या बांधकामास विद्युत पुरवठा करणाऱ्या सर्विस वायरचा अडथळा होत
असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांचे वीज कनेक्शन बंद केले. व दोन दिवसात पुन्हा सुरळीत करून देतो अशा आश्वासन दिले. पण या गोष्टीला दीड महिना होऊन गेला तरी तक्रारदाराचा विद्युत पुरवठा अजूनही सुरळीत केलेला नाही
याबद्दल वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार अर्जाद्वारे विनवणी केली तरीही विद्युत वितरण विभाग देवाळे नावली येथील अधिकारी चौगुले व वायरमन शेळके हे देवाळे गाव चे सरपंच व ग्रामसेवक त्यांच्या संगनमतांनी तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास मुद्दाम विलंब लावत आहेत अशी तक्रार नारायण मधुकर माने यांनी केली आहे.
माने यांच्या घरी वयस्कर आई राहतात तसेच घराच्या मागे घनदाट झाडी व दरड सारखा भाग आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे म्हणून विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.