तुम्ही अनेक मांसाहार प्रेमी पाहिले असतील, ज्यांच्या दिवसाची सुरुवात मांसाहाराने होते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की कोणी कच्चं मांस न शिजवता चवीने खातो? हे विचित्र वाटेल, परंतु एक व्यक्ती अशी आहे जी कच्चं चिकन खाते.
जोपर्यंत तो आजारी पडत नाही तोपर्यंत तो हे करतच राहणार असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे.
जॉन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला इंस्टाग्रामवर सुमारे साडेतीन लाख लोक फॉलो करतात. या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर कच्चे चिकन खातानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
तो म्हणतो, की तो एका विज्ञान प्रयोगाचा भाग म्हणून हे करत आहे, ज्याला त्याने Raw Chicken Experiment असं नाव दिलं आहे. जॉनच्या म्हणण्यानुसार तो 19 जानेवारीपासून कच्चं चिकन खात आहे. व्हिडिओंमध्ये तो मसाले आणि केचपसह कच्चं मांस खाताना दिसत आहे.