कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचे पालक वस्ताद बाळ दादा गायकवाड तथा बाळासाहेब राजाराम गायकवाड वय वर्षे ९०यांचे आकस्मित निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या मागे भाऊ-बहिणी, पुतणे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मार्गदर्शन व सहकार्याने बाळ दादा गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली.
कुस्तीगीर, कुस्तीगीरांचे संघटन, तालीम संस्था यांच्या विकासासाठी त्यांनी सहकार्य केले. तालीम संघाचे चीफ पेट्रन म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते.
सन ७० व ८० च्या दशकात या संघटनेचा राज्यात आदरयुक्त दबदबा होता. हिंदकेसरी गणपतराव आंधळकर, हिंदकेसरी मारुती माने यांना देखील त्यांचे मार्गदर्शन असायचे. हिंदकेसरी चंबा मुतनाळ ,महान भारत केसरी दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीकर, निग्रो बंधू यांच्यासह अनेक ख्यातनाम कुस्तीगिरांना व्यायामापासून आहारापर्यंत त्यांचे मार्गदर्शन असायचे .
सन ७० व ८० च्या दशकात दिल्ली येथील गुरू हनुमान यांच्या बिर्ला आखाड्याचे पैलवान वारंवार महाराष्ट्राला आव्हान द्यायचे अवघ्या राज्याला हा सल होता. म्हणून बालवयातच कोपर्डे तालुका करवीर येथील शाळकरी युवराज पाटील यांना कोल्हापुरात मोतीबाग तालमीत स्वतःबरोबर ठेवून पैलवान युवराज पाटील याला भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ल घडविला.
भावपूर्ण श्रद्धांजली
कुस्तीसम्राट युवराज पाटील वाचनालय,१० कारभारी सुभा, वसंतनगर, सांगली.
कुस्ती अध्यासन व संशोधन केंद्र, सांगली
कारभारी पाटील आणि परिवार, सांगली