कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
देशाभरात सायबर क्राईमचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने सिम कार्डच्याबाबतीत सुरक्षितता ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
देशभरात बनावट सिम कार्डच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे दूरसंचार विभागाने आता सिम कार्ड डिलर्ससाठी पोलिस आणि बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आल आहे.
याचबरोबर मोठ्या प्रमाणात सिम कार्ड खरेदी करण्याची पद्धत आता बंद करण्यात येणार आहे. त्याच्या जागी आता व्यवसाय कनेक्शनची नवीन तरतूद लागू करण्यात येणार.
तसेच आता सिम डीलर्सच्या केवायसीबरोबरच सिम घेणाऱ्या व्यक्तीची यापुढे केवायसीही केली जाणार असल्याचे दूरसंचार विभागान सांगण्यात आल आहे .