Health Tips : लहान मुले अनेकदा पोटदुखीची तक्रार करतात. कधीकधी वेदना आणि अस्वस्थतेची ही समस्या किरकोळ असते आणि काही दिवसांत हा त्रास बराही होतो. पण काही वेळेस मुले अनेक दिवस पोटदुखीची तक्रार करत असतात.
हळूहळू मुले चिडचिडी होऊ लागतात तसेच खाणं-पिणं पूर्णपणे बंद करतात. डॉक्टरांच्या मते, ही एक गंभीर स्थिती आहे आणि पालकांनी ते हलक्यात घेऊ नये. तसेच त्याकडे दुर्लक्षही करू नये. खरंतर, अशा समस्या हे आतड्यांतील कृमी किंवा जंतांचे लक्षण असू शकते. पोटातील जंत मारण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी ताकामध्ये हळद घाला. तसेच मुलांना हळदीचे दूध प्यायला देणे देखील गुणकारी आहे.
मुलांचा शारीरिक विकास होत नसेल तर त्यामागे पोटातील जंत हे एक महत्वाचे कारण असू शकते. अनेकदा मुलांना पोटात दुखण्यामागे जंत हेच कारण असते. मुलांच्या आहारातील बदल याला कारणीभूत असतात. अशावेळी मुलांच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने पोटातील जंत मुळापासून नाहीसे होतील – डॉ. सचिन पाटील, बालरोग तज्ज्ञ
पोटात जंत झाल्याची लक्षणे :
भूक न लागणे.
अचानक वजन कमी होणे.
पोटात वेदना होणे.
बद्धकोष्ठता.
वारंवार लघवी होणे.
अत्याधिक थकवा.
या पदार्थांचा करा आहारात समावेश –
१. कच्ची पपई : पपई पोटासाठी अतिशय गुणकारी असतो. पपईमुळे पोटातील जंत पूर्णपणे नष्ट होतात. ४ ते ५ चमचे गरम पाण्यात एक चमचा कच्चा पपईचा रस मिसळून घ्या. यामध्ये एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
२. नारळ : पोटातील जंत दूर करण्यासाठी नारळ हा आणखी एक चांगला घरगुती उपाय आहे. हे शरीरातील विष आणि कीटकदेखील काढून टाकते. नारळ पाणी आणि खोबरेल तेल दोन्ही फायदेशीर ठरतात.
३. अननस : अनेक मुलांना अननस खायला आवडतो. अननस खाल्ल्यामुळे पोटातील किडे दूर होतात. पोटातील जंतापासून सुटकारा मिळवण्यासाठी, मुले दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास अननसाचा रस पिऊ शकतात.
४. डाळिंब : पोटातील जंत दूर करण्यासाठी किंवा पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी डाळिंब हे एक चांगले फळ आहे. डाळिंबाची साल पाण्यात उकळून रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून बाळाला रिकाम्या पोटी द्या.
५. हळद : औषधी गुणधर्म असलेली हळद प्राचीन काळापासून घरगुती उपाय म्हणून वापरली जाते.