कॅल्शियम (Calcium) हाडांच्या चांगल्या विकासासाठी फार महत्वाचे असते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल वाढत्या वयात सांधेदुखी, हाडाचे इतर विकार उद्भवू शकतात. (High Calcium Foods) कॅल्शियम आणि व्हिटामीन डी युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराचा अनेक आजारांपासून बचावही करता येऊ शकतो.
कॅन्सर, डायबिटीस, ब्लड प्रेशरचे विकारही उद्भवत नाहीत. (5 Non Dairy Foods That Are High in Calcium) कॅल्शियमयुक्त पदार्थांच्या सेवनाने गंभीर आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते.
वयोगटानुसार कॅल्शियमची आवश्यकता किती असते (Calcium Required For Human Body)
मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार १९ ते ५० वर्ष वयोगटातील लोकांना १००० मिली ग्रॅम, ५१ ते ६० वर्ष वयोगटातही १००० मिली ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. ७१ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना १ हजार २०० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खाता येतील ते पाहूया.
दुधाव्यतिरिक्त कोणते पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियम भरपूर मिळते?
1) हिरव्या भाज्या
केल, कोलार्ड ग्रीन्स, टरनीप ग्रीन या भाज्या कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. १ कप कोलार्ड ग्रीनमध्ये जवळपास २६६ मिलीग्राम कॅल्शियम असते. रोजच्या जेवणात भाज्यांचा समावेश करा. सूप, सॅलेड किंवा भाजी बनवून भाकरी किंवा चपातीबरोरब खा.
२) टोफू
टोफूस सोयाबिन हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास २५३ मिली कॅल्शियम असते. टोफू सोलिडीफाय मिल्कपासून तयार होते. टोफू एक प्रोसेस्ड फूड आहे. टोफूमध्ये कोएगुलंट असतात जे सोयाबीनपासून तयार झालेले असतात.
दाट-शायनी केसांसाठी माधुरी लावते केसांना हा पदार्थ; आठवड्यातून एकदा १ उपाय, सुंदर होतील केस
३) बदाम
बदामात प्रोटीन, हेल्दी फॅट्सप्रमाणे कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात असते. १ औंस बदामात जवळपास ७६ मिली ग्रॅम कॅल्शियम असते. मेडिसिन नेट च्या रिपोर्टनुसार यात मॅग्नेशियम, फॉस्फरेस असते. ज्यामुळे बोन्स हेल्दी आणि निरोगी राहतात. डेअरी प्रोडक्ट्समध्ये ४८२ मिलीग्राम कॅल्शियम असते.
पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल
४) चिया सिड्स
चिया सिड्स कॅल्शियम आणि व्हिटामीन्सचा पॉवरहाऊस आहेत. २ टेबलस्पून चिया सिड्समध्ये जवळपास १७९ मिलीग्राम कॅल्शियम असते. चिया सिड्स वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत सिया सिड्स खाल्ल्याने चेहरा आणि केसही चांगले राहतात.