
झी मराठी वाहिनीवर लवकरच शिवा मालिका (Shiva Serial) भेटीला येत आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर झळकणार आहे.
अभिनेत्री पूर्वा फडकेला त्याची नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. तिखट स्वभावाची शिवा आणि गोड स्वभावाचा आशु यांची ही कहाणी मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शिवाच्या आईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकरने साकारली आहे.
शिवा मालिकेत सिताई ही भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर साकारत आहे. मीरा वेलणकर या दिग्दर्शिका तसेच निर्मात्या देखील आहेत. बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले. तसेच याअगोदर स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या तू तेव्हा तशी या मालिकेत मीराने एक छोटीशी भूमिका साकारली होती.


