
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून दिली आहे. यापूर्वी देशाचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार बिहारचे माजी मुख्यमंत्री कपूर्री ठाकुर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला होता. त्यामुळे २०२४ या वर्षात पाच दिग्गजांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.


