कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल आधिकाऱ्याची सुखरूप सुटका,भारताची कूटनीती यशस्वी

0
175

Sp-9 News प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

नवी दिल्ली :भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ भारतीय माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची आज सुटका करण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपुर्ण आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता.

कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्या विषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली.

मात्र आता ही बातमी येते आहे की या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती

त्यांची कतारने सुटका केली. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. आठ पैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारतात जेव्हा माजी नौदल आधिकाऱी परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय या घोषणा दिल्या. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता तर आम्ही सुटका कठीण होती असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे. कतारने ज्या माजी सैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये नौदलाच्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी या नौसैनिकांची नावे आहेत. कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत ते कार्यरत होते. या कंपनीमार्फत संरक्षणविषयक सेवा दिली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here