
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील गोरक्षनाथ मंदिरामध्ये धर्मनाथ बीज मोठ्या उत्सवात संपन्न झाला
गोरक्ष नाथ मंदिरात असणाऱ्या पादुकांवर पहाटे पाच वाजता जल अभिषेक करण्यात आला त्यानंतर
धर्मनाथ बीज निमित्त आज सकाळी पहाटे पाच वाजता कात्यायनी येथून गोरक्षनाथाची फुलांनी सजवलेली पालखी वाजत गाजत राजाराम टॉकीज शेजारी असणाऱ्या लक्ष्मीपुरीतील गोरक्षनाथाच्या मंदिरामध्ये आणली यावेळी गोरक्ष नाथाच्या पालखीचे भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
त्यानंतर गोरक्ष नाथ मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात आला असून ही परंपरा गेली पंधरा वर्षे चालत आली असल्याची माहिती गोरक्षनाथ मंदिराचे भक्त रमेश पवार यांनी फ्रंटलाईन youtube चे प्रतिनिधी विजय बकरे यांना सांगितले
गोरक्षनाथाचे मंदिराची सजावट व महाप्रसादाचे आयोजन धर्मनाथ मंदिराच्या भक्तांकडून करण्यात आला होता


