जगप्रसिद्ध मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन, अवघ्या २४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
175

Sp-9 News प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

मॅरेथॉनचा विश्वविक्रमवीर अ‍ॅथलिट केल्विन किप्टम याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. केल्विन किप्टोमने वयाच्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

सिन्हुआच्या वृत्तानुसार, केल्विन किप्टम याच्या कारमध्ये त्याचे प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना आणि आणखी एक महिला प्रवासी ही होते. केल्विन किप्टमचे प्रशिक्षकांचाही कार अपघातात मृत्यू झाला आहे.

या अपघातात कारमध्ये बसलेली एक महिला प्रवासी सध्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.केल्विन किप्टम शनिवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता पश्चिम केनियामधील कॅप्टेज ते एल्डोरेटला जात असताना त्यांची कार उलटली.

पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री ११ च्या सुमारास झाला. गाडीत तीन जण होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. किप्टम आणि त्याचे प्रशिक्षक हे दोन लोक आहेत.

पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘केल्विन किप्टम कॅप्टेजहून एल्डोरेटकडे जात असताना त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली, यात किप्टम आणि त्याच्या प्रशिक्षकांचा दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केल्विन किप्टमने शिकागो मॅरेथॉन दोन तास ३५ सेकंदांच्या विश्वविक्रमी वेळेत जिंकली होती.

जागतिक अ‍ॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को म्हणाले: ‘केल्विन किप्टम आणि त्याचे प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना यांच्या निधनामुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या वतीने, आम्ही त्यांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि केनिया देशाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही त्याला मिस करू. वार्षिक शिकागो मॅरेथॉनच्या ४५ व्या सीझनमध्ये सर्व यूएस राज्ये आणि १०० हून अधिक देशांतील सुमारे ४९ हजार व्यावसायिक आणि हौशी धावपटूंनी भाग घेतला.

ही शर्यत ग्रँट पार्कमध्ये सुरू होऊन शहराच्या २९ परिसरांतून जाऊन याच ठिकाणी संपते. नेदरलँडच्या सिफान हसनने महिलांची शर्यत २:१३:४४ या वेळेत जिंकली, जी मॅरेथॉन इतिहासातील महिलांची दुसरी सर्वात वेगवान वेळ आणि शिकागो कोर्सचा विक्रम आहे. १९७७ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेली, शिकागो मॅरेथॉन ही पाच जागतिक विक्रम, अनेक राष्ट्रीय विक्रम आणि असंख्य वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीचा मंच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here