
चहा बनवण्यात काय कठीण काम आहे. चहा बनवणं एकदम सोपं आहे. त्यात काय असतं फक्त पाण्यात चहापावडर, साखर, दूध टाकलं की चहा तयार… चवीसाठी त्यात चहा मसाला, आलं किंवा वेलची टाकायची.
चहाची रेसिपी सांगताना कुणीही असंच सांगेल. बहुतेक लोक चहा असाच बनवतात. पण चहा बनवणं हीसुद्धा एक कला आहे. चहातील प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट वेळेला टाकायचं असतो. 90 टक्के लोकांना याबाबत माहिती नाही.
भारतात चहाप्रेमी कमी नाहीत. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. काही जणांना दिवसभरात कधीही आणि कितीही चहा दिला तरी तो पिण्याची तयारी असते. काहींना एक विशिष्ट प्रकारचा चहा आवडतो. पण त्या चहाची चव तशीच कायम ठेवणं हे सोपं नाही. कारण ती बनवण्याची पद्धतच चुकीची असते. परफेक्ट चहा कसा बनवायचा हे आम्ही तुम्हाला सांगतो.
OMG! बटाट्याच्या पोत्यावर विचित्र खूण, महिलेला धक्का; PHOTO पाहून नेटिझन्सनही शॉक
घरी चहा बनवताना वेळ वाचवण्यासाठी लोक पाणी-दूध एकत्र करतात आणि उकळ आल्यावर आलं घालतात. पण या प्रक्रियेत मसाला, चहापावडर व्यवस्थित मिसळायला वेळ मिळत नाही. चहा बनवताना आधी पाणी उकळा. नंतर त्यात ठेचलेलं आलं, इतर मसाले घाला. त्यांना या पाण्यात किमान 1 मिनिटं उकळू द्या जेणेकरून मसाल्यांची चव चहामध्ये येईल. अनेक वेळा लोक आलं किसून घालतात, यामुळे चहा कडू होतो, असं आलं घालू नका. आता या उकळत्या पाण्यात चहापावडर टाका. चहापावडर टाकल्यानंतर पुढच्या 10 सेकंदात साखरही घाला. जर तुम्ही दुधात साखर घातली तर ते दूध पातळ करतं. चहा बनवताना तुमच्या लक्षात येईल की अनेकदा चहापावडर भांड्याला चिकटते. अशा परिस्थितीत, चमच्याने चहापावडर पुन्हा त्या भांंड्यातील चहामध्ये टाका.
Cadbury Dairy Milk उघडताच तरुणाला बसला धक्का; आत दिसली किळसवाणी गोष्ट, केला शेअर
साखरेनंतर चहात दूध घाला आणि चहा मध्यम आचेवर किमान 2 मिनिटं उकळवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चहा बनवण्यासाठी कधीही कच्चं दूध वापरू नये. चहा बनवण्यासाठी फक्त गरम केलेलं दूध वापरण्याचा प्रयत्न करा. फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध रूम टेम्प्रेचरवर येण्यासाठी बाहेर काढा. 2 कप चहा बनवायचा असेल तर 1 कप दूध काढून बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही उकळत्या चहामध्ये थंड दूध घालता तेव्हा चहाचं तापमान अचानक बदलते ज्यामुळे त्याची चव खराब होते.
परफेक्ट चहा रेसिपी
2 कप चहा बनवायचा असेल तर एक कप उकळलेलं दूध काढून बाजूला ठेवा.
2 कप चहासाठी भांड्यात 2 कप पाणी घाला आणि ते उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा.
पाणी उकळल्यावर या उकळत्या पाण्यात ठेचलेलं आलं टाका. (मसाला चहा असेल तर तुम्ही वेलची, लवंगा किंवा इतर मसालेदेखील यावेळी घालू शकता.)
हे पाणी किमान 2 मिनिटं उकळवा. या उकळत्या पाण्यात चहापावडर घाला आणि पुन्हा 2 मिनिटं उकळा. चहापावडरनंतर चहामध्ये साखर घाला.
यावेळी रूम टेम्प्रेचवरवर असेलं दूध घाला. चहा चमच्याने ढवळत राहा. यामुळे चहाचं तापमान राखलं जाईल.
2 मिनिटं दुधात उकळल्यानंतर चहा गाळून घ्या.
तुमचा परफेक्ट चहा तयार आहे.


