सध्या मोबाइल फोनच्या मागणीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी मोबाइल उत्पादक कंपन्यांमध्येही चढाओढ लागली आहे. यामध्ये सॅमसंग या कोरियन कंपनीचाही समावेश होतो.
सॅमसंगने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण फोन लाँच केले आहेत; मात्र त्यांच्या फोल्डेबल फोन्सबद्दल ग्राहकांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता दिसून येते. तुम्हीदेखील सॅमसंगचा फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G हे सॅमसंगचं लोकप्रिय फोल्डेबल मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. सध्या हा फोन लाँच किमतीपेक्षा फारच कमी किमतीत उपलब्ध आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G या फोनच्या बेस व्हॅरिएंटची लाँचिंग किंमत 89 हजार 999 रुपये आहे. बेस व्हॅरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळतो; पण सध्या हा फोन फ्लिपकार्टवर फक्त 64 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
म्हणजेच हा फोन मूळ किमतीपेक्षा 25 हजार रुपयांनी स्वस्त दरात मिळत आहे. याशिवाय, बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. ही ऑफर फोनच्या पिंक गोल्ड, बोरा पर्पल आणि ग्राफाइट या तिन्ही कलर व्हॅरिएंटवर मिळू शकते. या फोनवर सध्या कोणतीही एक्स्चेंज ऑफर उपलब्ध नाही.
सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G फोनची बेसिक स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X मेन डिस्प्ले आहे. तो फुल एचडी प्लस रिझोल्युशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळतो.
याशिवाय, फोनमध्ये 1.9 इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्लेदेखील आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. स्टोरेजचा विचार केल्यास, हा फोन 128GB आणि 256GB स्टोरेज व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हॅरिएंटमध्ये 8GB स्टँडर्ड रॅम आहे.
फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 12-मेगापिक्सेल ड्युएल-पिक्सेल ऑटोफोकस सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्सचा समावेश आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10-मेगापिक्सेल लेन्स आहे. फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग, 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 4.5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह 3700 mAh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोन पूर्ण चार्ज केल्यावर 19 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम किंवा 34 तासांचा टॉकटाइम देतो.